For any details about the organisation please write to info@amgm.org

Contact us: 9820072143 / 8369597470

9-Member Expert Committee

लॉकडाऊन नंतर दुर्ग भ्रमंती व ट्रेकिंग याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करता याव्या व त्या प्रक्रियेमध्ये सर्वांचा सहभाग असावा या हेतूने गिर्यारोहण महासंघाने पुढाकार घेऊन “लॉकडाऊन नंतरचे गिर्यारोहण, दुर्ग भ्रमंती, पदभ्रमण” या संदर्भात जनमत जाणून घेण्यासाठी सूचना पाठविण्यासाठी आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या गिर्यारोहण संस्थांकडून तसेच वैयक्तिक पातळीवरून देखील सूचना आल्या. या सर्व सूचनांचा विचार करून योग्य ते विश्लेषण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या (मुंबई, पुणे, नाशिक, पनवेल, खोपोली, कोल्हापूर, महाड इत्यादी) नऊ गिर्यारोहकांची तज्ञ समिती गठित केली. सदर समितीत दोन महिला सदस्यांचा देखील समावेश होता.

गिर्यारोहण संस्थांकडून तसेच वैयक्तिक पातळीवरून आलेल्या सूचनांचा योग्य तो विचार करून, त्यात आवश्यक ते बदल करून या समितीने त्यांच्या अहवालाद्वारे एक नियमावली गिर्यारोहण महासंघाला सादर केला. त्या समितीचा तपशील तपशील पुढील प्रमाणे आहे.

  1. श्री. हृषिकेश यादव (मुंबई) – गिर्यारोहण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व; एव्हरेस्ट शिखरावरील भारताच्या पहिल्या व यशस्वी नागरी मोहिमेचे नेते; यंग झिंगारो ट्रेकर्स चे संस्थापक; जगातील पहिल्या यशस्वी ‘अंध व मूकबधिर गिर्यारोहकांच्या’ हिमालयीन मोहिमेचे नेते; “सांगाती सह्याद्रीचा” या सारख्या ग्रंथाचे प्रमुख लेखक व संपादक; माजी उपाध्यक्ष, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, Youth Hostels Association of India
  2. डॉ. अमर अडके (कोल्हापूर) – दुर्ग भटकंती, अरण्य भटकंती आणि गिर्यारोहणाचा सुमारे अडतीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; शेकडो किल्ले, घाटवाटा आणि अरण्ये यांची अभ्यासपूर्ण भटकंती आणि त्यांचे छायाचित्रांसह संपूर्ण Documentation; “सह्याद्रिच्या गिरिशिखरांवरून”; संस्थापक, मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूरपुस्तकाचे लेखन; मा. सदस्य, गडकोट सवंर्धन समिती महाराष्ट्र शासन; विभागीय संपादक आणि लेखक, गॅझेटियर कोल्हापूर विभाग
  3. डॉ. राहुल वारंगे (महाड) – १९९६ पासून आजतागायत सातत्याने संस्थात्मक गिर्यारोहणाचा प्रसार व प्रचार यात कार्यरत; महाडधील “सह्याद्री मित्र” गिरिभ्रमण संस्थेचे संस्थापक सदस्य; बेसिक व ऍडव्हान्स कोर्स पूर्ण; “किल्ल्यांची भटकंती ” या पुस्तकाचे सहलेखन; विविध वृत्तपत्रांमध्ये लिखाण
  4. श्री. जयंत तुळपुळे (पुणे) – गिरिप्रेमी संस्थेचे संस्थापक सदस्य; १९७९ मधे NIM मधून बेसीक कोर्स; हिमालयातील शिखर मोहीमांमध्ये सहभाग; गिर्यारोहणावरील ‘अनातोलीच्या डायरीतून’ हे अनुवादित आणि ‘बेसकॅंपवरुन’ अश्या दोन पुस्तकांचे लेखक
  5. श्री. सुदर्शन कुलथे (नाशिक) – २५ वर्षांपासून ट्रेकिंग आणि भटकंती; वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण या संस्थेचे विश्वस्त ; NIM मधून बेसिक माऊंटेनिअरींग कोर्स (a grade) पूर्ण केला. भारतातील व नेपाळमधील अतिउंचीवरील ट्रेक; भारतातील जवळपास सर्व राज्यांत भटकंती आणि ट्रेक्स; नाशिक जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचा विशेष अभ्यास.
  6. श्री. पद्माकर गायकवाड (खोपोली) – यशवंती हायकर्स संस्थेचे संस्थापक सदस्य; सह्याद्री व हिमालयात अनेक प्रस्तरारोहण, गिर्यारोहण व पदभ्रमण मोहिमा; विमोचन (Rescue) कार्याचा प्रदीर्घ अनुभव.
  7. श्रीम. अपर्णा भट्टे (महिला सदस्य) – गिर्यारोहण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव (४४ वर्षे); वास्तुविशारद तसेच पर्यावरण नियोजन या दोन्ही विषयांत विशेष प्राविण्यासह मास्टर्स पदवी; ३२ वर्षे Youth Hostels शी संलग्न; सह्याद्री, हिमालय तसेच इतर खंडांमध्ये देखील गिर्यारोहणाचा अनुभव; ११ वर्षे सातत्याने निसर्ग साहस शिबिरांचे नियोजन व मार्गदर्शन
  8. डॉ. प्रिती पटेल Ph. D. (महिला सदस्य) – सह्याद्रीत अनेक वर्षे भटकंती, ऑफबीट ट्रेकर्स संस्थापक सदस्य, सह्याद्रीतील घाट वाटांवर वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक, विविध वृत्तपत्रांमध्ये व नियतकालिकांमध्ये लिखाण, Joy of Giving या माध्यमातून सह्याद्रीतील दुर्गम भागात सामाजिक बांधिलकी व जवळीक
  9. Gardian Giripremi Institute of Mountaineering (पुणे) – प्रस्तारोहण, हिमालयीन मोहिमा, प्रथमोपचार, साहस शिबिरे इ. आयोजित करणारी येथील गिर्यारोहण प्रक्षिक्षण संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to top