Appeal for suggestions
लॉकडाऊन नंतर ट्रेकिंग, भटकंती, गिर्यारोहण मोहिमा, विविध कॅम्पस, निसर्ग शिबिरे, जंगल सफारी यावर शासनाचे निर्बंध व नियमावली येण्याची शक्यता आहे. आपण सारे सह्याद्री प्रेमी आहोत त्यामुळे साहजिकच लॉकडाऊन नंतर आपापल्या ऍक्टिव्हिटी करताना आपणा साऱ्यांवरच एक जबादारी येऊन पडणार आहे.
अशावेळी आपण भटकंती सुरू करण्यापूर्वी व प्रत्यक्ष भटकंती करत असताना खूपच संवेदनशीलता दाखवणे व जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
तर गिर्यारोहण मोहिमा, ट्रेक्स, विविध कॅम्पस, साहसी मोहिमा, ट्रेल्स व भटकंती सुरू करताना, सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, स्वतःवर व समूहावर कोणती नवीन बंधन लावून घ्यावीत, काय शिस्त असावी, काय नियम असावेत, कोणती शिस्त पाळावी, ई ई विषयी आपल्या सूचना, नियम, नवीन कल्पना व विचार जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रास आपल्या या सूचना व विचारांचा एकूणच सकारात्मक उपयोग होईल हे नक्की.
आपणा कडून येणाऱ्या या सगळ्या मौलिक सूचनांचा योग्य तो विचार करून आपण शासनास काही सूचना करणार आहोत. जेणे करून आपले क्षेत्र बदनाम होणार नाही व मानवी जीवनास आणि निसर्गास अधिक बाधा येणार नाही.
तरी सदर मौलीक सूचना, आपले विचार व कल्पना आपण AMGM च्या e mail ID (giryarohanmahasangh@gmail.com) शनिवारी दि. 16 मे 2020 पर्यंत पाठवावेत ही विनंती.
आपले विनीत,
श्री उमेश झिरपे – अध्यक्ष
श्री ऋषिकेश यादव – कार्यकारी अध्यक्ष
टीम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ