Webinar series by AMGM
लॉकडाऊन नंतरचे गिर्यारोहण…
(सर्व गिर्यारोहक, निसर्गप्रेमी व पर्यटक यांच्यासाठी महत्वाची Webinar Series)शुक्रवार दिनांक २६ जून २०२० ते मंगळवार दिनांक ३० जून २०२० पर्यंत (५ दिवस)सायंकाळी ७:०० वाजता, रोज २ वक्तेWatch Onhttps://www.facebook.com/groups/mahasangh/मित्रांनो, कोविड-१९ (करोना) च्या अभूतपूर्व अशा संसर्गामुळे सारं जग भांबावलं आहे. लॉकडाऊन संपल्या नंतर सह्याद्रीतील दऱ्या-डोंगर, जंगल, किल्ले व धबधबे यातून भटकणाऱ्या साऱ्यांना निसर्गाचे वेध लागतील. भटकंती सुरू करावी की न करावी, जायचंच झालं तर काय काळजी घ्यावी, कसं वागावं, इत्यादी अनेक बाबतीत सगळेच जण संभ्रमात आहेत.म्हणूनच या बाबतीत जाणकार, अनुभवी व या क्षेत्रात स्वतःच आयुष्य वेचलेल्या नामवंत व्यक्तींना ऐकायची, त्यांचे विचार व दृष्टिकोन जाणून घ्यायची संधी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ (AMGM) एक Webinar च्या मालिकेतून आपल्याला देत आहे. या Webinar Series मध्ये आपल्या देशातील व परदेशातील काही जाणते गिर्यारोहक, जंगलतज्ञ, निसर्ग अभ्यासक, कायदेतज्ञ व इतर मान्यवर या संबंधातील त्यांचे विचार मांडणार आहेत.प्रत्येकी १० ते १२ मिनिटांच्या या Pre-Recorded Series मध्ये आपण ब्रिगेडियर. अशोक ऍबे, श्री. जॉन पोर्टर, श्री. हरिष कपाडिया, मा. न्यायमूर्ती श्री. अभय ओक, प्रा. प्र. के. घाणेकर, विंग कमांडर. श्री. देवीदत्त पांडा, श्री. सुनिल लिमये (IFS), डॉ. नितीन करमळकर & श्रीमती. उष:प्रभा पागे अशा मान्यवर व्यक्तींना भेटणार आहोत.चला तर मित्रांनो, जाणून घेऊ या, लॉकडाऊन नंतरची भटकंती कशी करावी ?
धन्यवाद !अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ(Poster Credit : Prajakta Malvankar)