Yashwanti Hikers, Khopoli plans function of IMD 2020
11 डिसेंबर 2020 हा दिवस संपन्न जैव विविधता” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय पर्वत दिन जगभर साजरा होत असताना, संपूर्ण महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने करण्यात आले.
त्यानुसार यशवंती हायकर्स खोपोली या गिर्यारोहण संस्थेच्या वतीने खोपोलीतील सुप्रसिद्ध सुभेदार धबधबा (Zenith waterfall) याठिकाणी शुक्रवार दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी सकाळी नऊ वाजता ” पर्वत पूजन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खोपोली च्या प्रथम नागरिक अर्थात नगराध्यक्षा मा.सौ.सुमन मोहन औसरमल व खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. गणेश शेटे यांच्या हस्ते पर्वत पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर खालापूर तालुक्याचे (RFO) Range Forest Officer मा. श्री. आशिष पाटील हे उपस्थितांना “संपन्न जैवविवधता” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
तदनंतर यशवंती चे शिलेदार गिर्यारोहणातील Rock Climbing, Rappelling, Zumaring इत्यादी विविध बाबींची प्रात्यक्षिके सादर करतील. व त्यानंतर उपस्थित यशवंती चे शिलेदार “भेरणेचे पठार” या डोंगरावर पदभ्रमण करतील.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक यशवंती हाय कर्स चे अध्यक्ष श्री. पद्माकर गायकवाड करतील आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंती चे सचिव
श्री. महेंद्र भंडारे हे करतील. उपरोक्त कार्यक्रमात खोपोली शहरातील अनेक नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक , पत्रकार आणि यशवंती चे शिलेदार गिर्यारोहक “Covid19” च्या पार्श्वभूमी चा विचार करून मर्यादित संख्या व खबरदारीच्या उपाय योजना आमलात आणून कार्यक्रमात सहभागी होतील.