For any details about the organisation please write to info@amgm.org

Contact us: 9820072143 / 8369597470

पूरग्रस्त सह्याद्रीवाडी मध्ये शाळेच्या इमारतीच्या बांधकामात AMGM ची मदत

सस्नेह नमस्कार,

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने यावर्षी 22 जुलैच्या महापुराचा फटका बसलेल्या महाड व चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात मदत केली गेली. त्या दरम्यान शिवथर घळ परिसरातील सह्याद्रीवाडी गावातील लहान मुले सध्या तात्पुरत्या निवाऱ्यात शिकत आहेत हे पाहण्यात आले. सह्याद्री वाडी हे डोंगरातील गाव संपूर्णपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. नवीन जागेमध्ये शाळेची कुठलीही सोय नसल्यामुळे तेथील विद्यार्थी अत्यंत गैरसोईच्या जागेमध्ये शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ही शाळा नव्याने बांधून देण्याचा संकल्प अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केला आहे.
नुकताच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शाळेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. लवकरच शाळेचे बांधकाम सुरू होईल. त्यासाठी अंदाजे सात लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. महासंघाने सुरूवातीच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. चांगल्या दर्जाचे शाळेचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तरी दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला मदत करावी ही विनंती.

धन्यवाद,

श्री. राजन बागवे – कार्यवाह, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ
श्री. धनंजय मदन – अध्यक्ष, रायगड डिस्ट्रिक्ट माऊंटेनियरींग असोसिएशन – प्रकल्प समन्वयक
सौ. शलाका वारंगे – सचिव, रायगड डिस्ट्रिक्ट माऊंटेनियरींग असोसिएशन- प्रकल्प समन्वयक

आर्थिक मदतीसाठी माहिती
Account Name : Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh
Bank Name : Bank of Maharashtra
Branch : Bhoiwada, Mumbai
A/c Number : 60388585172
IFSC : MAHB0000563
UPI ID : akhilmaharashtra@mahb

खालील संकेतस्थळावरून QR Code च्या माध्यमातूनही आपण मदतीची रक्कम पाठवू शकता.
https://amgm.org/donate/

Scroll to top