गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर – किल्ले पाहिलेला
गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर – किल्ले पाहिलेला माणूसगोपाल नीलकण्ठ दाण्डेकर म्हणजे महाराष्ट्राचे गोनीदा, मराठीतले एक अग्रगण्य कादंबरीकार. जातिवंत भटक्या वृत्तीचे. शिवछत्रपतींबद्दल नितांत आदर आणि त्यांची भटकी वृत्ती या मुळे त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ सगळे किल्ले पाहिले. काही किल्ले तर अनेक वेळा पाहिले. किल्ले पाहणे हा त्यांच्या निदिध्यास. गोनीदांनी आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कुणावर केलं असेल, तर ते किल्ल्यांवर. या किल्ल्यांच्या भटकंती मधून त्यांनी किल्ले, दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शिवतीर्थ रायगड अशी नितांत सुंदर पुस्तकं लिहिली. हजारो वाचकांना ते लेखन वाचून दुर्गदर्शनाची प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्रातल्या डोंगर भटकंतीला दिशा मिळाली.
गोनीदांचे दुर्गसंस्कार नवीन पिढीवर व्हावेत आणि गड-किल्ले मौजमजेचे स्थान नसून स्फूर्ती स्थाने आहेत हे अधोरेखित करणे या उद्देशानं एक ध्वनिचित्रफीत रूपाने माहितीपट करण्याचा संकल्प अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केला आहे. गोनीदा अवघ्या महाराष्ट्राचे होते. अनेकानेक महाराष्ट्रिकांबरोबर ते जोडले गेलेले होते. त्यामुळे या शुभंकर कार्यामध्ये सर्व गोनीदा प्रेमींना सहभागी करून घेण्याचा महासंघाचा प्रयत्न आहे. गोनीदांच्या आठवणी, फोटो, ध्वनी / चित्र फिती यांचा ठेवा महाराष्ट्र्भर पसरलेला आहे. यातील काही गोष्टी या माहितीपटात घेता येतील. शिवाय एक गोनीदांच्या आठवणीचं एक अत्यंत श्रीमंत दालन डिजिटल माध्यमातून त्यामुळे तयार करता येईल. गोनीदांच्या आठवणी, फोटो, ध्वनी / चित्र फिती gonidandekar@gmail.com या ई-मेल वर पाठवता येतीलया कार्यासाठी संयोजन समिती आणि कार्यकारी समिती, महासंघाने गठीत केली आहे. या समिती मध्ये महासंघाचे अध्यक्ष श्री उमेश झिरपे, कार्याध्यक्ष श्री ह्रिषीकेश यादव, सुप्रसिद्ध अभिनेत्री/ दिगदर्शिका मृणाल कुलकर्णी, श्री विजय जोशी, ऍड रवी परांजपे , श्री. अभिजित बेल्हेकर आदी मान्यवरांचा समावेश आहे. या समितीला मार्गदर्शन करण्याविषयीची महासंघची विनंती डॉक्टर वीणा देव यांनी मान्य केली असून त्या या उपक्रमाच्या सल्लागार असणार आहेत. श्री. निलेश देशपांडे प्रमुख निमंत्रक म्हणून काम पाहणार आहेत.हा माहितीपट साधारण पणे ५ ते सहा महिन्याच्या अवधीत पूर्ण व्हावा असा महासंघाचा मानस आहे. हा माहितीपट गोनीदांच्या पात्रतेचा व्हावा या साठी महासंघ कटिबद्ध आहे आणि काही प्रमाणत निधी उपलब्ध करून दिला आहे. पण कामाचा आवाका लक्षात घेता आर्थिक मदत लागणार आहे. त्याबाबतची माहिती पुढील संकेतस्थळावर आहे. https://amgm.org/donate
या माहितीपटाची झलक पाहण्यासाठी खालील संकेतस्थळावर जाऊ शकता. – https://www.youtube.com/watch?v=xUbBerbDGGE