AMGM कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
२ सप्टेंबर २०२०
AMGM च्या माध्यमातून Covid-19 आणि ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या परिणामांमुळे बाधित झालेल्या डोंगरातील गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व प्रत्यक्ष जाऊन मदत करणाऱ्या मुंबई विभागातील काही गिर्यारोहकांचा विशेष मानपत्र देऊन छोटेखानी सत्कार आज महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे करण्यात आला. मानकऱ्यांमध्ये ट्रेक क्षितीज चे राहुल मेश्राम, ऑफबीट सह्याद्रीच्या डॉक्टर प्रिती पटेल, सी आर ए सी चे हेमंत जाधव, संतोष दगडे आणि मंगेश कोयंडे ह्या प्रतिनिधींनी आपापल्या संस्थेतर्फे त्याचा स्वीकार केला तसेच त्यांचे प्रत्यक्ष थरारक अनुभवही कथन केले.
सध्याच्या कठीण परिस्थितीत मोठा कार्यक्रम करणे शक्य नव्हते तरीही आवश्यक ते सर्व नियम पाळून हा कार्यक्रम यथोचित पार पडला
किरण देशमुख
Team AMGM