सुधागड किल्ल्याच्या परिसरात अन्नधान्य वाटप
मित्रांनो,
बुधवार दिनांक १ जुलै, आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून AMGMच्या वतीने सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यातील वादळग्रस्तांना अन्नधान्य किराणा व इतर जीवनावश्यक वस्तू आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. सुधागड किल्ला परिसरातील दर्यागाव / ठाकूरवाडी या आदिवासी वस्तीमधील तब्बल २५० कुटुंबियांना मदत करण्यात आली. अन्नधान्य किराणा साहित्य हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, विवेकानंद सेवा मंडळ व ट्रेकक्षितिज या संस्थांनी उपलब्ध करून दिले.
साहित्य वाटप करीता पाच्छापूर शाळेतील प्राचार्य श्री. माळी सर, श्री. अनिल राणे सर, श्री. वारा सर, गावचे पोलीस पाटील श्री. वारघुडे, तसेच ग्रामस्थ श्री. विश्वास तांबट काका व बच्चू भुस्कुटे काका आणि इतर गावकरी मंडळींनी मदत केली. ट्रेकक्षितिज तर्फे पुणे येथून टेम्पो सोबत श्रेयस व महेंद्र तर डोंबिवली मधून पल्लवी, नयना काकू आणि मी स्वतः ठाकूरवाडीला साहित्य वाटपासाठी गेलो होतो.
सुधागड भागातील वादळग्रस्तांच्या काही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खारीचा वाटा उचलता आला, या बद्दल समाधान वाटते.
धन्यवाद विवेकानंद सेवा मंडळ
टीम – श्री. केतन बोन्द्रे, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ टीम – श्री. उमेश झिरपे… राहुल . सुदेश . मेश्राम (ट्रेकक्षितिज संस्था, डोंबिवली)
Akhil Maharashtra Giryarohan MahasanghAkhil Maharashtra Giryarohan MahasanghVivekanand Seva Mandal VsmVivekanand seva mandal,dombivliTrekshitiz Sanstha Trekshitiz SansthaTrek + Sahyadri = TreKshitiZ.comTreKshitiZRahul Meshram