For any details about the organisation please write to info@amgm.org

Contact us: 9820072143 / 8369597470

AMGM कडून मा. आदित्य ठाकरे यांना निवेदन सुपूर्त

मुंबई,12 नोव्हेंबर

आज मा. सिद्धार्थजी शिरोळे (आमदार, शिवाजी नगर, पुणे विधानसभा मतदारसंघ) यांच्या प्रयत्नांमुळे मा. आदित्यजी ठाकरे (पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्याशी भेट घेऊन पर्यटन खात्याने नुकतेच प्रस्तावित केलेल्या ‘साहसी उपक्रम धोरण’ या जि.आर.मध्ये असणाऱ्या त्रुटी व महाराष्ट्रातील तमाम साहसप्रेमी, निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्स, गिर्यारोहक इत्यादी यांचे संबंधित प्रस्तावित जी.आर. बद्दल असणारे  आक्षेप व प्रमुख मागण्या यांचे विस्तृत निवेदन ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने देण्यात आले. 

मा. आदित्यजी यांनी निवेदन समजावून घेऊन येत्या महिनाभरामध्ये साहसी उपक्रम व साहसी क्रीडा प्रकार यांच्याशी निगडित महाराष्ट्रातील प्रमुख संस्थांशी सविस्तर चर्चा करून कोणत्याही जाचक अटी नसलेला, सर्वसमावेशक व प्रगतशील ‘साहस उपक्रम धोरण’ जी.आर. पारित करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच साहसी क्रीडाप्रकार यांचे ‘खेळ’ म्हणून असणारे अस्तित्व अबाधित ठेऊन ते अधिक दृढ करण्याचेच प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.  मा. आदित्यजी यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीमध्ये मा. आमदार शिरोळे यांच्या सोबत उमेश झिरपे (जेष्ठ गिर्यारोहक व अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ), भूषण हर्षे (एव्हरेस्टवीर, समिती सदस्य, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ), चंदन चव्हाण ( समिती सदस्य, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ) हे उपस्थित होते.  

Scroll to top